धाराशिव (प्रतिनिधी)- अज्ञात चोरट्यांनी एका धावत्या टेम्पो ट्रॅव्हल्सचा पाठीमागील दरवाजा उघडून पिशव्यांमधील 23 तोळे सोन्याचे दागिने व कपडे चोरून नेले. ही घटना तेरखेडा परिसरात 26 डिसेंबरला रात्री 11 ते 11.30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

ठाणे जिल्ह्यातील पारसिक नगर कळवा येथील विकास खडके हे त्यांच्या नातेवाईकांसोबत छत्रपती संभाजीनगर येथून तुळजापूरकडे टेम्पो ट्रॅव्हल्सने निघाले होते. ट्रॅव्हलस तेरखेडा शिवारातील बोरी पेट्रोलपंच ते तेरखेडा दरम्यान आली. यावेळी अज्ञात व्यक्तीने ट्रॅव्हल्सच्या पाठीमागील शिडीवर चढून दरवाज्याचे कुलूप तोडले. डिक्कीतील 3 बँगांमधून 23 तोळे सोन्याचे दागिने व कपडे चोरून नेले. या प्रकरणी विकास खडके यांनी 27 डिसेंबर रोजी येरमाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा नोंद झाला आहे. वर्दळीच्या रोडवर अशी घटना घडल्यामुळे वाहनधारकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. 

 
Top