धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विवेकानंद सभागृहाचे उद्घाटन व सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे प्रमुख उद्घाटक म्हणुन लाभले होते यावेळी त्यांनी यांनी वरील उद्गार काढले.
ते पुढे बोलताना म्हणाले की, मराठवाड्यातील लोक खूपच प्रेमळ आहेत त्यांनी नेहमीच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेवर प्रेम केले आहे. गुरुदेव कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले की, येणारा काळ हा स्पर्धेचा आणि तंत्रज्ञानाचा असणार आहे. त्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी आपण नेहमी सज्ज असले पाहिजे. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य नानासाहेब पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. ते यावेळी म्हणाले की, येणारा काळ जरी स्पर्धेचा असला तरी देखील आपण सकारात्मक विचार करून त्याला सामोरे जाणे गरजेचे आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे आज देखील अहोरात्र कार्य करून संस्थेचा विकास करत आहेत.त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महाविद्यालयातील प्रत्येक गुरुदेव कार्यकर्ता ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षणप्रसार या ध्येयपूर्तीसाठी अहोरात्र काम करत आहे.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.वैभव आगळे यांनी केले. प्रस्ताविक प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी केले. तर आभार प्रा. माधव उगिले यांनी मानले. सदर कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.