तुळजापूर (प्रतिनिधी)- आमचे सरकार आल्याने आता एसटी कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करणे व शिस्त आवेदन पध्दत घालविण्यासाठी आम्हाला आंदोलन करावे लागणार नाही असे स्पष्ट करुन, छगन भुजबळ हे विचार करुन निर्णय घेतील. असे प्रतिपादन एसटी कामगार नेते ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी श्रीतुळजाभवानी दर्शनानंतर पञकारांशी संवाद साधताना केले.
बुधवार दि. 18 डिसेंबर रोजी तिर्थक्षेञ तुळजापूर येथे अँड गुणरत्न सदावर्ते व त्यांची पत्नी ॲड. जयश्री पाटील यांनी श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर हाँटेल स्काँयलँन्ड येथे पञकारांशी संवाद साधताना म्हणाले की, महाराष्ट्रात महायुती सत्ता यावी. महाविकास आघाडीची येवु नये व मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान व्हावेत असा नवस मी श्रीतुळजाभवानी आईला बोललो होतो. तो पुर्ण झाल्याने नवसपुर्तिसाठी मी आल्याचे सांगुन, शेतकरी, कष्टकरी वर्गाचे प्रश्न आता आमचे सरकार आल्याने लवकर सुटावेत असे साकडे देविला घातल्याची स्पष्ट केले.
पुढे म्हणाले कि, एसटी कर्मचाऱ्यांनी महायुतीला सत्तेवर आणले आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोग तातडीने लागु करावा व शिस्त आवेदन पध्दत घालवावी. या आमच्या मुख्य मागण्या असुन सरकार आमचे असल्याने आता यासाठी आंदोलन करावे लागणार नाही असे यावेळी म्हणाले. पण विलीनीकरण मुद्दाबाबत बोलणे टाळले. छगन भुजबळ बाबतीत बोलताना म्हणाले कि, ते ओबीसीचे नेते आहेत. जी भूमिका घेतील ती विचार करुन घेतील असे यावेळी स्पष्ट केले. केज तालुक्यातील मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणावर प्रश्न विचारला असता पोलिसांनी पोलिसासासारखे काम करावे. वर्दी अंगावर घातला कि तो समाजाचा नसावा अशी भूमिका मांडली. यावेळी अँड. जयश्री पाटील उपस्थित होत्या.
काँग्रेस जाती जातीत भांडण लावते
गांधी, नेहरुंनी देशाचे नुकसान केले आहे. गांधीने तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक हत्या केली आहे असे सांगून ॲड. सदावर्ते यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा गैर अर्थ काढून काँग्रेस जाती जातीत भांडणे लावते असा आरोपही ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.