धाराशिव (प्रतिनिधी) - फिजिओथेरपी ही केवळ उपचाराची एक पद्धत नसून ती रुग्णांच्या जीवनात नवीन उमेद व अशा निर्माण करणारी शास्त्र शाखा आहे अशा शाखेत आपण प्रवेश घेतला त्याबद्दल आपले करावे तेवढे अभिनंदन कमी आहे अशा शब्दात डॉ. स्मिता शहापूरकर यांनी वेलनेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ प्रसंगी मनोगत व्यक्त करताना सांगितले. यावेळी व्यासपीठावर धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील, सरपंच प्रमोद वीर,डॉ.पूजा आचार्य,प्राचार्य अमर कवडे ,डॉ.गणेश गोरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

पुढे बोलताना प्रमुख पाहुण्या डॉ.शहापुरकर यांनी विद्यार्थ्यांना फिजिओथेरपीच्या महत्त्वाविषयी आणि यामुळे आरोग्यसेवेत होणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी विचार मांडले.प्रमुख पाहुण्यांच्या व्याख्यानाने विद्यार्थ्यांमध्ये प्रोत्साहनाचा नवा संचार झाला. तसेच, पालकांनीही या शाखेतील करिअरच्या संधींबाबत समाधान व्यक्त केले.


फिजिओथेरपी ही काळाची गरज डॉ. प्रतापसिंह पाटील 

आज अनेक रुग्ण हे शारीरिक व्याधीने त्रस्त आहेत.गुडघेदुखी सांधेदुखी यासह अनेक गोष्टींमध्ये रुग्णांना फिजिओथेरपीची गरज असते. जर रुग्णांना चांगली सेवा देता आली तर फिजिओथेरपी ही वैद्यकीय शाखेतील एक महत्त्वाची शाखा असून  यातील प्रात्यक्षिक कार्य चांगल्या पद्धतीने जर आपण शिकलात तर भविष्यात आपल्याला या क्षेत्रात  खूप संधी राहणार असल्याचे मत डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केले व नूतन विद्यार्थ्यांना पुढील काळात सर्व सुविधा व्यवस्थापनामार्फत पुरवण्याचा शब्द त्यांनी दिला.


 
Top