धाराशिव (प्रतिनिधी)- सविता राजेश म्हैत्रे, वय 49 वर्षे, रा. दत्त कॉलनी काकडे प्लॉट धाराशिव ता. जि. धाराशिव या दि. 04 डिसेंबर 2024 रोजी त्यांचे पती सोबत मोटरसायकल वरुन समता कॉलनी येथील दत्त मंदीर समोरील रोडवरुन जात होत्या दरम्यान अनोळखी इसम यांनी पाठीमागून मोटरसायकल वर येवून सविता म्हैत्रे यांचे गळ्यातील 17 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण अंदाजे 1 लाख रूपये किंमतीचे जबरीने लुटून पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी सविता म्हैत्रे यांनी दि.05 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.