तुळजापूर (प्रतिनिधी)-तालुक्यातील आपसिंगा येथील पंचवीस वर्षीय महिलेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

या बाबतीत अधिक माहीती अशी की, मयत मयुरी सुरज गुरव, वय 25 वर्षे, रा. आपसिगा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी रविवार दि. 8 डिसेंबर रोजी (18.00 ) वा. सु.आपल्या राहत्या घरात लोखंड्या ॲगलला गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी  सुरज धोंडीबा गुरव (पती), धनश्री धीरज गुरव, (जाउ), धीरज धोंडीबा गुरव (दीर), छाया धोंडीबा गुरव (सासु) सर्व रा. आपसिंगा ता. तुळजापूर जि. धाराशिव  (पती व जाउ) यांचे अनैतिक संबध असलेले माहेरच्या लोकांना का सागिंतले व लॅबेरिटी टाकण्यासाठी पाच लाख रुपये माहेरहुन घेवून आली नाही या कारणावरुन मयत मयुरी हिस दिलेल्या जाचास व मानसिक त्रासास कंटाळून मयुरी यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी संजय विठ्ठल गुरव, रा. तुरोरी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.9 डिसेंबर रोजी दिली त्यानुसर गुन्हा नोंद झाला आहे.

 
Top