तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील काक्रंबा गावातील मुख्य रस्त्यावर केले जाणारे नवीन सिमेंट रोडचे काम रखडल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत होते. याचे वृत्त विविध दैनिकात प्रसिध्द होताच मंगळवार दि. 10 डिसेंबर रोजी पाणीपुरवठा पाईट टाकणे काम सुरु केल्याने अखेर रस्ता करणे काम मार्ग मोकळा झाला आहे.
याची दखल सरपंच कालीदास खताळ यांनी घेऊन संबंधित ठेकदारास चांगलेच सुनावताच ठेकेदार वठणीवर येवुन त्याने रस्ता कामासाठी खोदलेल्या रस्त्यावर प्रथम जलजीवन पाणीपुरवठा पाईप लाईन टाकण्यास आरंभ केला. हे काम होताच सिमेंट रस्ता काम केले जाणार आहे. यामुळे ग्रामस्थांची होणारी गैरसोय दुर होणार आहे.