भूम (प्रतिनिधी)- बांगलादेश वाशियाकडून हिंदूवरील वाढत असलेला अन्याय अत्याचार तात्काळ थांबला पाहिजे यासाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने उपविभागीय कार्यालया मार्फत लेखी मागण्यांचे निवेदन भारत सरकारकडे पाठवून देण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात सकल हिंदू बांधव न्याय मोर्चामध्ये सहभागी असलेला दिसून आला.
गेल्या अनेक महिन्यापासून बांगलादेशमध्ये हिंदू वरील अन्याय अत्याचारामध्ये वाढ झालेली आहे. हिंदू जनजागृती करणारे चिन्मय स्वामी महाराज यांचा छळ करून त्यांना डांबून ठेवले आहे. महिलांवर अत्याचार वाढले आहेत. हा सर्व प्रकार थांबला पाहिजे याचसाठी मंगळवार दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी नगर पालिका - ओंकार चौक - वारदवाडी रोड मार्गाने न्याय यात्रा काढून भूम उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत लेखी निवेदन भारत सरकारला पाठविण्यात आले.
न्याय यात्रेमध्ये प्रामुख्याने एक हे तो सेफ है, एकही नारा एकही नाम जयश्रीराम जयश्रीराम, बांगला देशातील अत्याचार थांबला पाहिजे, वंदे मातरम, हिंदूवरिल अन्याय थांबलाच पाहिजे, भारत माता की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, अहिल्याबाई होळकरांचा विजय असो, अण्णाभाऊ साठेचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणला होता. या न्याय यात्रेमध्ये सकल बांधव मोठ्या संख्येने सहभागी होते.