धाराशिव (प्रतिनिधी)-  तेरणा अभियांत्रिकी  महाविद्यालयातील फार्मसी विभागातील  शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची छत्रपती संभाजीनगर येथील औषध निर्माण क्षेत्रातील मल्टिनॅशनल कंपनी ' श्रेया लाईफ सायन्सेस ' येथे अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने नुकतीच भेट झाली.

धाराशिव जिल्ह्यातील तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा  अभियांत्रिकी महाविद्यालयात फार्मसी विभाग कार्यरत आहे. औषध निर्मिती क्षेत्रातील  कंपन्यांमध्ये फार्मसी विभागांच्या पहिला बॅच पासूनच विद्यार्थ्यांना औषध निर्माण कंपन्यांचे भेटी देऊन त्यांना कंपनीमध्ये औषध निर्मितीची प्रोसेस कसे होतात याचे ज्ञान दिले जाते, यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील एडोरा फार्मा, सवेरा फर्मा, गोवा येथील इंडिको फार्मा या कंपन्यांच्या भेटी झाल्या तसेच यावर्षीही फार्मसी क्षेत्रातील छत्रपती संभाजीनगर येथील श्रेया लाईफ सायन्सेस येथे भेट देण्यात आली. यावेळी ह्युमन रिलेशनशिप मॅनेजर  संजय विटोरे व स्टेराइल हेड रामलिंग चिवटे यांनी  कंपनी विषयी सर्व माहिती दिली. तेरणा फार्मसी विभाग हे विद्यार्थ्यांच्या नोकरी संदर्भात देखील कार्यरत आहे. औषध निर्माण क्षेत्रातील नामांकित जागतिक स्तरावरील कंपन्या रिलायन्स फार्मा, वखाडृ लिमिटेड,वखाडृ बायोटेक,श्रेया लाईफ सायन्सेस, इत्यादी तसेच  टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (टीसीएस),गिब्स, विमटा लॅब्स, आय के एस हेल्थ यासारख्या आयटी नामांकित कंपन्यांमध्ये फार्मसी विभागातील 70% पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची निवड झाली. दिवसेंदिवस पॅकेज व निवड संख्यात वाढ होत आहे. तसेच टीसीएस सारख्या नामांकित कंपनीमध्ये चालू वर्षासाठी  पाच विद्यार्थ्यांची व आय के एस हेल्थ मध्ये दोन विद्यार्थ्यांची निवड झाली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विक्रमसिंह माने म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या वाटचालीचा विचार करून क्षेत्रातील  अभियांत्रिकी व फार्मसी साठी जास्तीत जास्त नोकरीच्या संधी उपलब्ध करून, नोकरी मिळवून देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील  तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय हे प्रथम कॉलेज ठरले आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डाटा सायन्स ही शाखा असल्याने व या शाखेचे एप्लीकेशन  औषधशास्त्र निर्मितीमध्ये दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे इंडस्ट्रियल  तज्ञांच्या मदतीने फार्मसीच्या विद्यार्थ्यांनाही आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा सायन्स या क्षेत्रामध्ये  भविष्यात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना 

सर्वोच्च पॅकेजवर नोकरी मिळू शकेल असा विश्वास महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ.विक्रमसिंह माने यांनी व्यक्त केला आहे. तेरणा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.पद्मसिंह पाटील, आमदार विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, विश्वस्त मल्हार पाटील, संस्थेचे सर्व विश्वस्त, व्यवस्थापकीय समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे, प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, डॉ. प्रीती माने, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट हेड डॉ.गुरुप्रसाद चिवटे, व कर्मचाऱ्यांनी  विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांच्या कंपनी भेटीसाठी टीपीओ डॉ. गुरुप्रसाद चिवटे यांनी विशेष प्रयत्न केले. नियोजन प्रा. शुभम सांजेकर, प्रा. सायली पवार यांनी केले.

 
Top