तेर( प्रतिनिधी)- तेर येथील रहिवासी व सध्या सांगली येथे असलेल्या प्रतिभा जगदाळे यांच्या “हसरी शाळा“ या बाल काव्यसंग्रहास, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर, यांचा 2024 चा 'उत्कृष्ट बाल वाङ्मयाचा' पुरस्कार मिळाला..

हा पुरस्कार, शाहू स्मारक भवन सभागृह, दसरा चौक, कोल्हापूर येथे, भारतीय साहित्य समीक्षक आणि भाषाशास्त्रज्ञ, पद्मश्री डॉ. गणेश देवी  आणि माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे  यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी दमसासचे अध्यक्ष  प्रा. भीमराव धुळबुळू, विजय चोरमारे, दि. बा. पाटील, डॉ. विनोद कांबळे, डॉ. रामकली पावसकर आणि मान्यवर उपस्थित होते.

 

 
Top