धाराशिव (प्रतिनिधी)- नगरोत्थान महाअभियानांतर्गत धाराशिव नगरपालिकेला मंजूर झालेल्या 140 कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांना गेल्या नऊ महिन्यांपासून जाणूनबुजून अडवून ठेवल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

शिवसेना शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील 59 रस्त्यांच्या कामांसाठी 140 कोटी रुपये मंजूर झाले होते. 23 फेब्रुवारी 2024 रोजी प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर सात दिवसांत निविदा काढणे आणि तीन महिन्यांत काम सुरू करणे बंधनकारक होते. मात्र, अद्यापही कामांना सुरुवात झालेली नाही. सत्ताधारी भाजपाने 140 कोटींच्या रस्त्यांच्या कामांची मोठी जाहिरातबाजी केली होती. मात्र, प्रत्यक्षात कामे न करता जनतेला वेठीस धरण्याचे काम गेल्या नऊ महिन्यांपासून केले जात आहे, असा आरोप गुरव यांनी केला आहे.

शहरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. वाहनचालक त्रस्त झाले असून, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. काहींना खड्ड्यांमुळे जीवही गमवावा लागला आहे. यावरून राजकारण करण्यातच सत्ताधाऱ्यांना धन्यता वाटत असल्याचे गुरव म्हणाले. 8 मार्च 2024 ते 28 मार्च 2024 या कालावधीत निविदा सादर करण्याची मुदत होती. 29 मार्च 2024 रोजी निविदा उघडण्यात येणार होत्या. मात्र, निविदा प्रक्रिया जाणूनबुजून उघडू दिली नाही. यासाठी मुख्याधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणीही गुरव यांनी केली आहे. जेणेकरून कोणाच्या सांगण्यावरून कामे थांबवली हे लक्षात येईल.

  यावेळी प्रवीण कोकाटे,बंडू आदरकर,सिद्धेश्वर कोळी, अशोक पेठे,राकेश सूर्यवंशी,पंकज पाटील, निलेश साळुंके.विजय ढोणे,सुरेश गवळी, यशवंत शहापालक,शहाजी पवार,महेश देवकते, मनोज उंबरे,संकेत सूर्यवंशी, नाना घाडगे,साबेर सय्यद,सुरज भुतेकर,एच एम देवकते, बाळासाहेब काकडे, तुषार निंबाळकर,, मनोज पडवळ, अमित जगधने, प्रशांत जगताप, वैभव पाटील, पांडुरंग भोसले,नंदकुमार माने, गफूर शेख, गणेश राजेनिंबाळकर,संदीप शिंदे, जगु शिंदे, अक्षय जोगदंड, नितीन शेरखाने, सद्दाम सय्यद, बिलाल कुरेशी, बाळासाहेब वरुडकर, कुणाल वाघमारे, अक्षय भालेराव, तौकीर पटेल, ओमकार बांगर, अभिषेक पाटील, योगेश गरड, गणेश असलेकर, उमाकांत कसबे, सुधीर अलकुंटे, लक्ष्मण जाधव, सह्याद्री राजेनिंबाळकर, हर्षद ठवरे,  अविनाश शेरखाने, गणेश खोतरे, अतुल खराडे, शहबाज पठाण आदि उपस्थित होते.

 
Top