तेर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात पशुधन विकासाला नवी दिशा देण्यासाठी, बायफ लाईव्हलीहुडने गाय आरोग्य तपासणी यंत्र गायीच्या गळ्यामध्ये बसवून त्यांच्या शरीराची हाल चाल, शरीराचे तापमान, आजाराचे लक्षण अशे वेगवेगळ्या लक्षणे दाखवणारे व्यवस्थापन पशुपालकांना मोबाईल ॲप द्वारे पहाता येणार आहे हा नाविन्यपूर्ण उपक्रम महाराष्ट्र राज्यात धाराशिव जिल्हात प्रथमच राबविण्यात येत आहे.
कळंब तालुक्यातील देवळाली गावामध्ये बीएसएस मायक्रोफायनान्सच्या सामाजिक जबाबदारीतून जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या पशुधन विकास कार्यक्रमांतर्गत बायफ मार्फत वैज्ञानिक दृष्टीकोनातून पशुपालन सक्षम करण्यासाठी गाय आरोग्य यंत्राचे उपकरण किंवा तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
देवळाली ता.कळंब येथील पशुपालक पांडुरंग खापरे व विठ्ठल खापरे यांच्या 10 एच. एफ. गायींमध्ये ही उपकरणे बसविण्यात आली आहेत. ही उपकरणे गायींचे आरोग्य, पुनरुत्पादन आणि पोषण यावर लक्ष ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे रोग वेळेवर ओळखता येतात आणि दूध उत्पादन सुधारते.
गाय फिट उपकरणाचे मुख्य फायदे- आरोग्य क्रियाकलाप, तापमान आणि हृदय गती. प्रजनन क्षमता सुधारते: हे योग्य वेळी कृत्रिम गर्भाधान सुनिश्चित करते. आहार व्यवस्थापन: आहाराशी संबंधित समस्या ओळखतात. लोकेशन ट्रॅकिंग - गायींच्या स्थानाची अचूक माहिती. डेटा विश्लेषण: पशुपालक शेतकऱ्यांना चांगले निर्णय घेण्यास मदत करणे. पशुपालकासाठी वैज्ञानिक पशुसंवर्धनाच्या दिशेने एक मोठे पाऊल असूनगाय आरोग्य तपासणी यंत्रामुळे गायींचे आरोग्य आणि पुनरुत्पादन निश्चितच सुधारणा असून. गाय तपासणी आरोग्य यंत्राबाबतचे त्यांचे अनुभव पशुपालक इतर गावातील पशुपालकांनाही सांगतील.
धाराशिव जिल्यातील हा उपक्रम राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी आदर्श ठरेल. यामुळे पशुपालनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब करून पशुपालकांचे शाश्वत जीवनमान बळकट होण्यास मदत होईल.
पशुसंवर्धनातील नावीन्यपूर्ण आणि तांत्रिक प्रगतीचा हा मिलाफ पशुपालनासाठीच फायदेशीर नाही, तर शाश्वत ग्रामीण विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
-अतुल मुळे,बायफ, प्रकल्प अधिकारी, धाराशिव.