धाराशिव (प्रतिनिधी)- हरंगुळ -पुणे (गाडी क्र. 01487) व पुणे -हरंगुळ (गाडी. क्र. 01488) या गाडया लातूरसह धाराशिव व बार्शी येथील प्रवाश्यांची पुण्याला जाणारी महत्वाची गाडी असून सदर रेल्वे गाडीस मुदत 30 डिसेंबर 2024 रोजी संपत होती. लातूर-धाराशिव-बार्शी येथून मोठया प्रमाणात नागरीक पुण्याकडे ये-जा करत आहेत. ही गाडी रेल्वे प्रवाश्यांच्या सोईने असल्या कारणाने पुणे – लातूर ये- जा करणे सोईचे झाले होते. परंतू रेल्वे निर्णयानुसार मुदत संपत आल्याने खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सदर गाडीस मुदतवाढ देणेबाबत महाप्रबंधक मध्य रेल्वे मुंबई यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार सदर रेल्वेगाडीस मुदतवाढ दिली असल्याचे रेल्वे मुख्यालय मुंबई यांच्याकडून कळविण्यात आले आहे.