धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्री संत ज्ञानेश्वर मंदिर सभागृहात उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे यांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित रुपामाता समूहाचे प्रमुख व्यंकटराव गुंड यांच्या हस्ते देवीची मूर्ती व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. वसंतराव नागदे यांनी त्यांच्या जीवनात केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे रुपामाता परिवाराचे प्रमुख व्यंकटराव गुंड यांनी व्यक्त केले. यावेळी रुपामाता मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी संस्थेचे मुख्याधिकारी मिलिंद खांडेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.