तुळजापूर-

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे तुळजाभवानी शिक्षण संकुलामध्ये सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी कौस्तुभ गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर यांनी वरील प्रतिपादन केले, उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की, कोणतेही संघटन त्याचवेळी बांधले जाते ज्यावेळी संघटनेचे तत्व आणि विचार शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचले जातात,शिक्षक हा अर्जुनाप्रमाणे शैक्षणिक ध्येयावर संधान साधणारा असावा, वैज्ञानिक युगात नवनवीन संशोधन होत आहेत, विज्ञान पुढे जाऊन माणूस मागे रहातोय असे वातावरण आभासी विश्वाने निर्माण केले आहे, म्हणूनच शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मार्फत विविध सामाजिक सर्वे होणे आवश्यक आहे, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सहकार्याने सामाजिक बांधिलकी जोपासली जाते, स्वच्छता अभियान हे केवळ कचऱ्याचे न होता माणसाच्या मनाचेसुध्दा झाले पाहिजे, यासाठी आपल्या भोवतालचे वातावरण पोषक बनविण्याचे कार्य शैक्षणिक संस्थेने करणे गरजेचे आहे असे अनमोल मार्गदर्शन त्यांनी केले.अध्यक्षीय समापनाप्रसंगी मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ जयसिंगराव देशमुख म्हणाले की, तुळजापूरच्या मातीत जीद्द आहे,उमेद आहे,या मातीतला माणूस संघर्षापासून पळुन न जाणारा आहे तो कणखर होऊन अडचणींना सामोरे जातो.म्हणूनच शिक्षकांची जबाबदारी जास्त वाढते कारण या मातीतील ऊर्जेला योग्य खतपाणी दिले भविष्यात येथील तरुणांच्या जीवनाचे सोणे होईल.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र प्राचार्य डॉ जीवन पवार यांनी केले.यावेळी श्री तुळजाभवानी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य दोंड, मुख्याध्यापक यलगुंडे,मुलानी सर, डॉ मच्छिंद्र नांगरे ,प्रा धनंजय लोंढे यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विवेकानंद चव्हाण यांनी तर आभार प्रा ज्योतिर्लिंग क्षीरसागर यांनी मानले.

 
Top