धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र  धुरगुडे यांनी दि.24 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांची  मुंबई येथे भेट घेतली. महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच महायुती  घवघवीत यश मिळाल्याबद्दल व अजित पवार यांची पुन्हा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल जिल्हाध्यक्ष महेंद्र  धुरगुडे यांच्यावतीने भेट घेऊन सत्कार व अभिनंदन करण्यात आला.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते पार्थ पवार यांची ही भेट घेतली. जिल्ह्यातील पक्षा बद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष यांचे वडील कै. स्वातंत्र्य सेनानी भानुदासराव जयवंतराव धुरगुडे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा व मराठवाडा विभाग स्तरीय शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे त्याविषयी माहिती देण्यात आली.

 
Top