तुळजापूर (प्रतिनिधी) - लग्नसराई वर्षअखेर मुळे शालेय व शासकीय कार्यालयीन सुट्ट्यां, मार्गशीर्ष महिना पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ भाविकांची मंगळवार दि. 24 डिसेंबर रोजी प्रचंड गर्दी झाली होती.
श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. पहाटे ऐक वाजल्या पासुन देवीदर्शनार्थ भाविकांनी श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ कुलधर्म, कुलाचार करण्यासाठी गर्दी केली होती. आज धर्मदर्शनार्थ गर्दी वाढल्यामुळे अडीच ते तीन तास लागत होते. तिर्थक्षेञ तुळजापूर शहरात आज सर्वञ भाविकांची प्रचंड वर्दळ होती. श्रीतुळजाभवानी दर्शना नंतर भाविकांनी प्रसाद साहित्य साठी बाजारपेठेत गर्दी केली होती.
अतिक्रमणाचा भाविकांना !
श्रीतुळजाभवानी मंदीर महाध्दार समोर किरकोळ व्यापाऱ्याने ठाण मांडल्याने भाविकांना मंदीरात ये-जा करण्यासाठी कसरत करावी लागली .मंदीर महाध्दार समोरील रस्त्यावर किरकोळ विक्रेत्यांनी ठाण मांडल्याने मंदीरात भाविकांना येजा करणे कठीण झाले होते.
वाहतूक कोंडी !
रविवार श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ भाविक खाजगी वाहनांनी आल्याने तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील वाहनतळे महामार्ग रस्ते वाहनांनी खच्चुन भरुन गेले होते. विशेष म्हणजे पुणे तुळजापूर रस्त्यावर शनिवार राञी पासुन प्रचंड वाहतुक कोंडी निर्माण झाल्याने भाविकांना वाहनांनी येण्यास पाच तास लागत होते.