धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्यकर्ता आदिवासी समाजासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या गोदावरी परुळेकर यांच्या 'जेव्हा माणूस जागा होतो ' या पुस्तकातील  'पाड्यावरचा चहा 'या पाठ्यांशातील आदिवासी - वारली लोकांना साध्या चहासाठी किती धावपळ करावी लागते , साध्या साध्या गोष्टी साठी किती संघर्ष करावा लागतो हे अनुभवता यावा.

म्हणून प्रशालेतील सतत नाविन्यपूर्ण उपक्रम अध्यापनात करणारे मराठी अध्यापक शशीकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आठवीच्या विद्यार्थ्यांनी चहा करण्यासाठी लागणारे साहित्यापासून अगदी तो चुलीवर करण्यापर्यंतचा अनुभव याची देही याची डोळी अनुभवला. समाजामध्ये असाही वर्ग आहे की जो  साध्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाही हेही त्यांना या निमित्ताने अनुभवले.

यावेळी प्रशालेतील आठवीचे विद्यार्थ्यासह उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक सुनील कोरडे, मराठी अध्यापक नेताजी मुळे, लक्ष्मण भोसले, श्रीमती मोहिते, राजाभाऊ पवार, शरद क्षीरसागर, राजेंद्र जोगदंड, दयानंद शिराळ, सिद्धेश्वर खडके, महेश राजे, शिवाजी भोसले, काकासाहेब शिंदे , शंकर माकणीकर, अमोल देवकुळे, एस. बी. संकपाळ व सर्व महिला अध्यापिका यांनी मुलांनी तयार केलेल्या चहाचा आस्वाद घेत छोटीखानी पार्टी या निमित्ताने अनुभवली.

 
Top