धाराशिव (प्रतिनिधी) - ग्लोबल ग्रॅण्ट प्रोजेक्ट क्रमांक 2464651 अंतर्गत रोटरी क्लब व रोटरी सेवा ट्रस्ट उस्मानाबाद, दि रोटरी फाऊंडेशन, टी.बी. लुल्ला फाऊंडेशन सांगली व रोटरी क्लब लेकलँड सनराईज (अमेरिका), रोटरी क्लब सोमर्विल्ले, ऑकलंड व रोटरी डिस्ट्रिक्ट (इंडिया) आणि रोटरी डिस्ट्रिक्ट (अमेरिका) यांचे सौजन्याने उस्मानाबाद जिल्ह्यात एकुण 12 नेत्र तपासणी शिबीरे घेण्यात आले यामध्ये जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी व उपचार मोहीमेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील शाळांमधुन 5 वी ते 12 इयत्तेतील आजपर्यंत एकुण 2787 विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली.
सदरील शिबीरामध्ये मुलांनी डोळ्याची कशी काळजी घ्यावी, अभ्यास करत असतांना डोळ्यांवर ताण येऊनये म्हणुन कोणती काळजी घ्यावी, चष्म्याचा नंबर लागु नये किंवा लागला असेल तर तो कसा कमी करता येईल या विषयी सर्व मार्गदर्शन करण्यात आले व याची माहिती देणरे पत्रकही सर्वांना देण्यात आले.
या सर्व शिबीरामध्ये तपासणीमध्ये एकुण 134 विद्यार्थ्यांना चष्म्याचा नंबर निघाला असून या सर्व विद्यार्थ्यांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात येणार आहे. या शिबीरामध्ये तपासणी करतेवेळी तिरळेपणा व डोळ्याच्या इतर आजाराचे देखील निदान झाले असून त्यांना जे.एफ. अजमेरा रोटरी नेत्र रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी बोलावण्यात आले आहे.
सदरील सर्व शिबीरांमध्ये डॉ. जी.एल. कांबळे, नेत्र सहाय्यक एस.बी. शिंदे, नेत्र सहाय्यक शिवरुद्र ईसाके यांनी तपासणीस म्हणुन काम पाहिले व शिबीर यशस्वीतेसाठी रोटरी क्लब उस्मानाबादचे अध्यक्ष डॉ. श्रीराम जिंतूरकर, माजी प्रांतपाल रविंद्र साळुंके, प्रमोद दंडवते, अशोक मंत्री, अभिजीत पवार, रो. सुनिल गर्जे, चंदन भडंगे, अतुल देशमुख यांनी परिश्रम घेतले. तर शिबीर यशस्वी करण्यासाठी सर्व शाळांचे मुध्याध्यापक श्रीमती इंगळे एस.व्ही., श्रीमती हाके दैवशाला, श्रीमती डॉ. औसेकर एस.ए.,. माने यु.सी., श्री. पडवळ सर व सर्व शाळांच्या शिक्षकवृंदाचे मोठे सहकार्य मिळाले.