भूम - 

बीड येथे मस्सा जोगचे सरपंच स्व संतोष देशमुख यांची अमानुष छळ करुन हत्या करण्यात आली. यातील आरोपीना तात्काळ अटक करुन फाशीची शिक्षा द्यावी. तसेच परभणी येथे संविधानाची विटंबना झाल्यानंतर दंगल उसळली त्यात एका निष्पाप एलएलबीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी स्व सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक करुन त्यांना मारहाण करण्यात आली न्यायालयीन कोठडीत असताना त्याचा मूर्त्यू झाला. त्यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या दोषींना अटक करुन त्यांना शिक्षा द्यावी. या दोन्ही घटनेचा निषेध व श्रद्धांजली सभा गोलाई चौकात पार पडली. चंद्रमणी गायकवाड युवा मंचच्या वतीने ही श्रद्धांजली सभा घेण्यात आली. 



यात प्रमुख पक्षाच्या पदाधिकारी व नागरिकांनी दोन्ही घटनेबाबत संताप व्यक्त केला. यातील दोषी आरोपीना तात्काळ अटक करावी तसेच परभणी येथील पीडित स्व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटूंबाला 50 लाखाची मदत करावी अशी मागणी केली. शेवटी दोन मिनिटे स्तब्ध राहून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी चंद्रमणी गायकवाड, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेनातालुका प्रमुख अनिल दादा शेंडगे, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विलास शाळू, शिवश्री विट्टल अण्णा बाराते, ऍड सिराज भाई मोगल, वडार संघटना तालुकाध्यक्ष दीपक पवार, भटक्या विमुक्त जाती जमाती संघटना मराठवाडा उपाध्यक्ष बबन लष्कर, स्वराज्य संघटनेचे नेते ऍड विलास पवार, ऍड विनोद नाईकवाडी, शिवसेना नेते विहंग कदम,युवा सेना प्रल्हाद अडागळे,आखिल भारतीय पारधी समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ काळे, दीपक मुळे,युवा नेते महेंद्र गायकवाड, जेष्ठ नेते कांतीलिंग थोरात, रवींद्र दादा लोमटे, सायरन गायकवाड, राहुल पवार, अज्जु वाघमारे, कदू जानराव, विकी जावळे, यश गायकवाड, सचिन सोनटक्के, राहुल शिंदे, पंकज चौधरी, प्रकाश सीतापे, अमोल शेलार, पंचशील गायकवाड, भास्कर वारे, रुपेश शिंदे, तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

 
Top