तुळजापूर - तुळजापूर शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर तुळजापूर लातुर महामार्ग रस्त्यावर काक्रंबा दहा हजार लोकवस्तीचे गाव असुन येथे अवैध दारु विक्री मटका अदि अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बळावले असल्याने हे अवैध धंदे बंद करण्याची मागणी ग्रामस्थासह लाडक्या बहीणीतुन केली जात आहे.
.ग्रामसभेत दारुबंदी ठराव गेली अनेक वर्षापासून होत असतानाही या ठरावाला केराच्या टोपलीत स्थान मिळत आहे, काक्रंबा या गावांमध्ये दारू, मटका, असे अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. विशेष म्हणजे चौकात शाळा मंदीर लगत सुरु असुन दुकानात ही अवैध हातभट्टी देशी विदेशी दारु बेकायदेशीर पणे विक्री केली जाते. दारू व जुगाराच्या व्यसनांमुळे येथील तरूण पिढी व अनेक कुंटुंब उद्धवस्त झाली आहे.अनेक शिकण्यासवरण्याच्या वयात तरूण मुले व्यसनाधीन होत आहेत. येथील अवैध धंद्यामध्ये सामाजिक कार्यकते सहभाग असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे..दारु मटक्याच्या नादामुळे सर्वसामान्य मात्र कष्टाची कमाई घालवत आहेत. येथील दारु मटका अड्ड्यांवर पोलिसांची कारवाई केली जाते. मात्र कारवाईनंरत मागे लगेच धंदे पूर्ववत सुरू होतात. त्यामुळे पोलीस केवळ कारवाईचा फार्स करीत आहेत, आसाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पोलीस महासंचालकांच्या परिपत्रकाप्रमाणे गावामध्ये वेळोवेळी घेण्यात आलेल्या ग्रामसभांमध्ये अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात ठराव घेतले जातात. ग्रामसभेत ठरावांना मंजुरी देखील मिळते. मात्र त्यानंतरही अवैध धंदे सर्रासपणे सुरू राहतात. अवैध दारुधंदे असेच सुरु राहिले तर माञ गावचे गावपण हरवले जाणार आहे.