धाराशिव (प्रतिनिधी)-अनेक वर्षापासूनची प्रलंबीत मागणी संदर्भात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांच्याकडे लातूर  मुंबई सुपर फास्ट (गाडी क्र. 22107 व 22108) कळंब रोड व  नांदेड पनवेल (गाडी क्र. 22143 व 22144) ढोकी स्टेशन येथे थांबा देणेबाबत लोकसभेच्या सभागृहात अग्रही मागणी केली.

धाराशिव जिल्हयातील ढोकी व कळंब रोड येथे मोठी बाजारपेठ असून परीसरातील नागरीक दोन्ही ठिकाणी बाजारपेठ असल्यामुळे ये-जा करत असतात. या ठिकाणी रेल्वे स्थानक अस्थित्वात असून या ठिकाणी लातूर मुंबई सुपर फास्ट तसेच नांदेड पनवेल या गाडयांना थांबा नसल्याकारणाने परीसरातील नागरीकांना धाराशिव रेल्वे स्थानक येथे जावे लागते. यात नागरीकांना प्रवासासह अन्य समस्यांना सामोरे जावे लागते. याचा विचार करुन अनेक वेळा खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी थांबा मिळणेबाबत लोकसभेत मागणी केली होती. तसेच सदर ठिकाणी थांबा देणेबाबत रेल्वे मंत्र्यांशी पत्र व्यवहार व वैयक्तीक भेट घेवून देखील थांबा देणेबाबत विनंती केली होती. यानंतर दि. 28/08/2019 दि. 08/10/2020 दि. 13/07/2021 दि. 15/10/2023 विभागीय रेल्वे मंडळाच्या बैठकीत देखील सदर ठिकाणी थांबा देणेबाबत विषय मांडला होता. परंतू रेल्वे मंत्रालय व विभागीय रेल्वे मंडळाकडून थांबा देणेबाबत कोणताही निर्णय न झाल्याकारणाने 18 व्या लोकसभेच्या हिवाळी अधिवेशन दरम्यान रेल्वे विभागाच्या चर्चे दरम्यान सदर ठिकाणी थांबा देणेबाबत रेल्वे मंत्र्यांकडे अग्रही मागणी करण्यात आली.


 
Top