तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेत्र तुळजापूर सह तालुक्यात हजारो कोटी रुपयाचे महामार्ग रस्ते पवनचक्की व सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची कामे चालु असल्याचा या अनुषंगाने तालुक्यात गुंडगिरी दशहत वाढली आहे. ही गुन्हेगारी दुष्प्रवृत्ती वेळीच न रोखल्यास तालुक्यात बीड, बिहर सारखी बनून अनेक वाल्मीक अण्णा तयार होण्याची शक्यता आहे.

तिर्थक्षेत्र तुळजापूर शहरात ड्रग्ज शिरकाव झाला आहे. मटका, जुगार, अवैध दारू, एमडी ड्रग्स, अवैध पार्किंग वसुली, अवैध चक्री जुगार, विविध लॉजवर येणाऱ्या फिरत्या वेश्या व्यवसाय याचे प्रमाण वाढले आहे. तिर्थक्षेञ तुळजापूर महिलेसाठी सुरक्षित अशी ओळख होती ती आता पुसली जात आहे. सतत काँलेज मुलीं लाँज मध्ये नेवुन लैंगिक अत्याचार घटना वाढत आहे. आरोपी सापडले जात नाहीत. देशी रिवाल्वरर्स ही येत असल्याची चर्चा आहे. यामधून तुळजापूर शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढलेले दिसून येत आहे. प्रशासनाने ठिकठिकाणी वेळोवेळी सातत्य ठेवून कठोरातील कठोर कारवाई करून धाक निर्माण करणे आवश्यक आहे.

लोकप्रतिनिधि व अधिकारी यांनी एकञित येवुन स्ञीशक्ता देवता आपली आई म्हणून प्रसिध्द तिर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील अवैद्य धंदे बंद करण्यासाठी पोलिस खात्याने आपली जुनी ओळख दाखवणे गरजेचे बनले आहे. पवनचक्की वाल्याने आपल्या स्वार्थासाठी गुंड पोसल्या मुळे ग्रामीण भागात गुंडगिरी दहशत वाढली आहे. गुंड बाळगुन पवनचक्की कामे करणे ही प्रवृत्ती वाढल्यामुळे आज ग्रामीण भागातील शेतकरी मजूरकरी वर्ग दहशतखाली जीवन जगत आहे. या कामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुखमंञी एकनाथ शिंदे, अजित पवार, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जातीने लक्ष घालणे गरजेचे बनले. याअनुषंगाने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना अशा प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्याच्या सक्त  गरज आहे. भाविक शेतकरी नागरिक असो की सामान्य नागरिक त्यांच्या हिताचे रक्षण होणे गरजेचे बनले आहे. येथील संघटित होणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी मोक्कासारखा कायदा वापरण्याची वेळ येवु नये.

 
Top