धाराशिव (प्रतिनिधी)- रिप्लब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) चे जिल्हा नेते रवि माळाळे यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.धाराशिव जिल्हा रुग्णालय येथे न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिम्मित रवि माळाळे व सिव्हिल सर्जन डॉ. चाकूरकर, डॉ. दिग्गज दापके, डॉ. भोसले, डॉ. सोनटक्के आदी मान्यवरांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा नेते रवि माळाळे, मराठवाडा उपाध्यक्ष पोपट लांडगे, रोजगार आघाडी प्रदेश उपाध्यक्ष नाना शितोळे, रो. आ. जिल्हाध्यक्ष उत्तम भालेराव, मराठा आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रवि पाटील त्याच बरोबर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच कुष्टाधाम येथील रुग्णांना चादरीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा नेते रवि माळाळे यांनी केले होते. यावेळी या कार्यक्रमाला मेजर माशाजी शेडगे, कलप्पा दुपारगुडे, सुरज चांदणे, शिवाजी राठोड,सरपंच शरद मस्के, तुकाराम कदम, बालाजी नागटिळे, गिरीश माळाळे, दत्ता ताकपीरे, सोनू माळाळे, उमेश माने, मोसीन तांबोळी, अक्षय कदम, सुरज शिंगाडे, आकाश राठोड तसेच रिपाईचे असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


 
Top