भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या अर्जांचा अक्षरशः पाऊस पडला होता. यामध्ये जिल्हा परिषद गटामधून 87 इच्छुकांचे व पंचायत समिती गणासाठी 133 इच्छुकांचे अर्ज वैद्य ठरले होते. अर्ज माघारी घेण्याच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद सुकटा गटातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उषा सूर्यकांत कांबळे व वालवड गटातून सोनाली रणजीत शिर्के यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सुप्रिया संजीव पाटील यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अर्ज राहिलेला आहे. तसेच पंचायत समिती इट गटातून शिवसेना शिंदे गटाचे युवराज हुंबे, पखरुड गटातून शिवकन्या बाळासाहेब लिमकर यांनी आपला अर्ज माघारी घेतला आहे. त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख यांचा एकमेव अर्ज राहिला आहे. तर आज शनिवार रोजी वालवड जिल्हा परिषद गटातुन सोनाली रणजित शिर्के यांनी व पखरुड पंचायत समितीसाठी शिवकन्या बाळासाहेब विणकर यांनी आज अर्ज माघारी घेतला. अर्ज माघारी घेण्यासाठी आता एक दिवसांचा कालावधी उरलेला आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी लढतीचे चित्र बदलत जाणार आहे.