तेर (प्रतिनिधी)- तेर येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या वतीने उत्कृष्ट कार्याबद्दल अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी गटविकास अधिकारी संतोष नलावडे,तेर येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉ.विजय विश्वकर्मा, डॉ .संगमेश्वर घोंगडे, ॲड.भाग्यश्री देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पर्यवेक्षिका वसुंधरा कुलकर्णी, कल्पना मोहीते, संतोष नलावडे,सोनाली यादव यानी आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी मनिषा पाटील यांनी केले.सूत्रसंचलन वसुंधरा कुलकर्णी व जोशीला लोमटे यांनी केले तर शितल गाढवे यांनी आभार मानले.


यांचा झाला सत्कार 

कार्यकर्ती रोहीणी कांबळे(तेर), वृषाली भिसे (खेड),स्वाती हैद्राबादे (कोंड), इंदुबाई लगडे (जागजी), लता कांबळे(ढोकी), मंगल चव्हाण (दुधगाव), मिनाक्षी सोनार (आळणी), मदतनीस महादेवी शिंदे (तेर), आशा काकडे (मुळे वाडी), आशालता जाधव (कोंड), शारदा भालेकर( जागजी), मंगल माळी (ढोकी), संध्या कसबे( दुधगाव), रसिका भंडारे( आळणी).

 
Top