तुळजापूर -बांगलादेश मधील हिंदूंवरील होत असलेल्या अत्याचारा विरोधात हिंदू समाजाच्या वतीने निषेध रॅली काढून माननीय पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले..
मा पंतप्रधान . नरेंद्रजी मोदी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि बांगला देशात हिंदू बांधवावर होत असणाऱ्या अनन्वित अत्याचार
थांबविणेबाबत व त्यांना सुरक्षा देणेबाबत.
उपरोक्त विषयी आम्ही सर्वजण निवेदन करतो की, संपूर्ण जगभरामध्ये हिंदू धर्माचे
अनुयायी वास्तव्यास आहेत. ते सर्व लोक त्या त्या देशाच्या कल्याणासाठी स्वतःचे अखंडपणे
योगदान देत आहेत. ज्याप्रमाणे बांगलादेश या ठिकाणी हिंदू समाज मोठया संख्येने वास्तव्यास
असून त्या देशासी प्रामाणिक राहून ते वास्तव्यास आहेत, परंतू बांगलादेशमध्ये सत्तांतर होवून
अंतरीम सरकारची स्थापना झालेली असून सरकार बदलानंतर हिंदू धर्मियांवरती अनन्वीत
अत्याचार, महिलांवरती बलात्कार तसेच नृशंस हत्या सत्र चालू आहे, ज्यामध्ये अंतरीम सरकार
हिंदूना कुठलीच सुरक्षा प्रदान करत नसल्याचे लक्षात येत आहे, यामध्ये इस्लामीक आतंकवाद
वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. शेजारील घराला आग लागलेली असताना ती वेळीच
विजवली गेली नाही तर त्याची धग आपल्या घराला (देशाला) लागल्याशिवाय राहणार नाही. तरी
हे सर्व हत्यासत्र व अत्याचार थांबविण्यासाठी भारत सरकारने वेळीच उपाययोजना प्रदान
बांगलादेशमधील सर्व हिंदू बांधवांना सुरक्षित व भयमुक्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून
शीघ्र गतीने प्रयत्न करावेत यासाठी हे निवेदन आपणास सादर करत आहोत.
बांगलादेशमधील असलेला प्रत्येक हिंदू हा आमचा धर्मबांधव आहे, त्याच्यावरील
अत्याचार यापुढे हिंदू समाज कदापी सहन करणार नाही तरी याची आपण गंभीरतेने दखल घ्यावी.
हे निवेदन
महंत योगी मावजीनाथजी महाराज
महंत इच्छागित महाराज महंत वाकोजी बुवा
महंत व्यंकट अरण्य महाराज अदि सह हिंदू बांधवांनी दिले