तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या दर्शनार्थ सध्या लग्नसराई पार्श्वभूमीवर नवविवाहीत नवदांम्पत्य व देवी भक्तांबरोबरच राजकिय पक्षांच्या कार्यक्रमांना येणाऱ्या राजकिय भक्तांची एकच गर्दी होत आहे. याचा ञास देविभक्तां बसुन मंदीर सुरक्षा यंञणे वर मोठा ताण पडत आहे.
मंगळवार दि. 10 डिसेंबर रोजी देविभक्त नवविवाहीत, नवदांम्पत्य बरोबरच देविजीस साकडे घालण्याच्या राजकिय कार्यक्रमास आलेल्या देविभक्त अशा देविभक्तांची एकच गर्दी झाल्याने याचा ञास खास देविदर्शनार्थ आलेल्या देविभक्त व नवविवाहीत नवदांम्पत्यांना बसला.
तिर्थक्षेञ राजकिय कार्यक्रम घेतल्यास त्यास प्रसिद्धी मिळते व भाविक वर्ग विशेषता महिला वर्ग मोठ्या संखेने सहजगत्या सहभागी होतात. त्यामुळे सर्वच राजकिय पक्ष शक्ती प्रर्दशनासाठी मंदीर परिसराचा वापर करण्याकडे कल वाढला असल्यामुळे राजकिय भक्तांचा गर्दीचा ञास देविजीचा भक्तांना बसत आहे. या कालावधीत अचानक गर्दी नियञंणसाठी मार्गही बदलावे लागत आहेत. या गर्दी वेळेत भाविकांचे नातेवाईक ही हरवत आहे. या गर्दीचा लाभ चोरांना होत आहे. यात भक्तांचे सोनेदागिने, पैसा चोरीला जात आहे. अर्थिक रुपाने भाविकांनाच याचा फटका बसत आहे. मंदिर प्रशासनाने अशा कार्यक्रमास मंदीरात प्रतिबंध घालावा. एकदम होणाऱ्या गर्दीमुळे सुरक्षा यंञणेवर प्रचंड मोठा ताण पडत आहे. राजकिय भाविक गर्दी मंदीर प्रशासन व भाविकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. राजकिय कार्यक्रम महाव्दार समोरील मोकळ्या जागेत करण्याची मागणी होत आहे.