कळंब (प्रतिनिधी)- राष्ट्रीय चर्मकार महासंघ कळंब शाखेच्यावतीने श्री संत गुरु रविदास महाराज यांची पुण्यतिथी संत गुरु रविदास महाराज मंदिर विद्यानगरी कळंब येथे मराठवाडा युवक अध्यक्ष विकास कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली. सकाळी संत रविदास महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार घालण्यात आला.
यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. जालिंदर लोहकरे, जिल्हा उपाध्यक्ष रंगनाथ कदम, महिलाध्यक्षा आशा राऊत, तालुकाध्यक्ष अशोक लाड, युवक तालुकाध्यक्ष सतीश कदम, तालुका संघटक प्रमोद नरहिरे, तालुका सल्लागर शिवाजी शिंदे, सहसचिव बळीराम बोबडे तर सचिव सुहास कदम, उपाध्यक्ष प्रा. अभिजीत बोबडे, बाबासाहेब कांबळे, मधुकर माने, विलास सुरवसे, बालाजी साबळे, कमलाकर शेवाळे, विनोद कांबळे, भिकचंद शेवाळे, संजय ताटे, बोबडे सर, आप्पाराव कदम, गोरोबा सातपुते, कुणाल कदम यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.