धाराशिव (प्रतिनिधी)- 6 डिसेंबर 1992 रोजी आयोध्या येथील बाबरी मस्जिद उद्ध्वस्त केल्याच्या घटनेचातसेच उत्तर प्रदेश येथील संभल गावातील जामा मस्जिदचे सर्वेक्षण प्रकारानंतर झालेल्या गोळीबारात निष्पाप लोकांचा बळी गेल्याप्रकरणी निषेध करत अजमेर येथील सुफी संत ख्वाजा मोईनोद्दीन चिश्ती रहे. या दर्गाहच्या सर्वेक्षणाचा जाहीर निषेध धाराशिव येथील मुस्लिम बांधधंवानी केला आहे.

याबाबत देशाच्या राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदनात म्हटले की, आयोध्येतील जातीयवादी संघटना व पक्ष यांनी पुर्वनियोजीत कट करुन कारसेवकांच्या मदतीने बाबरी मस्जिद उद्ध्वस्त करुन मस्जिद पाडली. त्यानंतर संपूर्ण देशात अराजकता माजून दंगली घडून हजारो लोकांचे बळी गेले, घरे उद्ध्वस्त झाली. या घटनेचा आम्ही तीव्र्र निषेध करीत आहोत. त्याकाळातील अराजकतेला जबाबदार असणार्‍या व्यक्ती व संघटना व त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर देशात विविध ठिकाणी गुन्हे दाखल असून अद्याप त्यांना कोणत्याही प्रकारे शिक्षा झाल्याचे ऐकिवात नाही. ही बाब अत्यंत निंदणीय व लाजिरवाणी असून या घटनेमुळे जगामध्ये देशाची प्रतिमा मलिन झाली आहे. तरी आपण सदरील घटनेच्या लोकांवर विविध ठिकाणी खटले चालवून त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी जेणेकरुन भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये व ज्या लोकांचे प्राण गेले आहे त्यांना न्याय मिळेल. निवेदनावर मसूद शेख, खलिफा कुरेशी, बिलाल तांबोळी, समीयोद्दीन मशायक, वाजीद पठाण, आयाज शेख, कादरखान पठाण, मैनुद्दिन पठाण, तौफिक पठाण, गयासोद्दीन शेख, अफरोज पीरजादे, इब्राहीम शेख, बाबा मुजावर, एजाज काझी, अन्वर शेख, मुदस्सीर काझी, आतिक शेख, असलम शेख, कलीम कुरेशी व इतर बांधवांची स्वाक्षरी आहे.

 
Top