तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील काटी येथील ग.भा. ताराबाई यशवंतराव देशमुख वय (88) वर्षे यांचे तुळजापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुपारी 4:15 वाजता दु:खद निधन झाले. त्या माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सतिश देशमुख यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी 8 वाजता येथील कंटेश्वर मंदीराच्या पाठीमागील देशमुख स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
%20%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%20%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96.jpeg)