धाराशिव (प्रतिनिधी)-  20 नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 241 - तुळजापूर विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान झाले. दि. 23 नोव्हेंबर रोजी तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्पोर्ट हॉल येथे सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 

भारत निवडणूक आयोगाने मतमोजणी निरीक्षक म्हणून रामप्रसाद चौहान यांची नियुक्ती केली आहे. निवडणूक प्रक्रिया अथवा मतमोजणीच्या बाबतीत कोणास काही तक्रार असल्यास मतमोजणी निरीक्षक चौहान यांना भेटण्यासाठी शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथे 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजता आणि दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजताच्या कालावधी उपलब्ध राहणार आहे.

 
Top