तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर नगरपरीषदने गेली आठ ते नऊ महिन्या पासुन स्वछता ठेक्याचे बिल न दिल्याने ठेकेदारास कामगारांच्या पगारी करणे कठीण बनले आहे. तरी शासनाने ठेकेदाराचे बिल देण्यासाठी निधी देण्याची मागणी ठेकेदारासह कामगारांमधुन केला जात आहे.

तिर्थक्षेञ तुळजापूर नगरपरिषद प्रतिदिनी शहरातील बारा टन  कचरा  संकलन करते. मंगळवार, शुक्रवार, रविवार, पोर्णिमा, शारदीय नवराञ उत्सव, याञा कालावधीत तर  वीस ते तीस टन कचरा संकलन करावे लागते. यासाठी शेकडो कामगार वाहने लावावे लागतात. शहरवासिय कचरा पडला कि लगेच ओरडा करतात त्यांना चोवीस तास सेवा द्यावी लागते. माञ ठेकेदाराचे मार्च 2024 ते नोव्हेबर 2024 या कालावधीतील बिल रखडले आहे. यात ही आँक्टोबर महिन्याचे अर्धा बिल अदा केले गेले आह.  दिपावली सारख्या सणात सुध्दा बिल न दिल्याने कामगारांना दिवाळी साजरा करता आली नाही. यामुळे तुळजापूर नगरपरीषदकडे स्वच्छता ठेकेदार यापुढे येथील ठेका घ्यावा का नाही या मनस्थितीत आले आहे. मुख्याधिकारी लक्षमण कुंभार बिल काढतो म्हणतात पण ते काढले जात नसल्याने स्वछता कर्मचाऱ्यांच्या पगार करणे कठीण बनले आहे. नगरपरिषद मधुन इतर बिले काढले जातात. माञ या बिलास का टाळाटाळ केली जाते असा सवाल कामगारांमधुन केला जात आहे.

 
Top