तुळजापूर (प्रतिनिधी)- काटी सावरगाव येथेही महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत अधिकृत उमेदवार अँड. धिरज पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष रामचंद्र आलुरे, सरपंच सुजीत हंगरगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. 

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी महायुती सरकारच्या योजनावर जोरदार विरोध करत म्हंटले की, चालू आमदार फक्त दिखावा करत अनेक योजना येणार आहेत. प्रत्यक्षात एकही योजना अद्याप आली नाही. थापा देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत. अँड. धिरज पाटील असे आवाहन केले की, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आम्ही सोयाबीनला सात हजार रुपये भाव देऊ. तुळजापूर विधानसभा क्षेत्रात उद्योग धंदे, रोजगार, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोऊ. यावेळी रामचंद्र आलुरे यांनी म्हंटले की तालुक्यात, देशात लोकशाही टिकवायची असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार अँड. धिरज पाटील यांना  बहुमताने निवडून आणावे लागले.

यावेळी सरपंच सुजीत हंगरगेकर यांनीही काटी ग्रांमस्थानां आवाहन केले की अँड. धिरज पाटील हे आपले घरचे आमदार आहेत. आपण त्यांना आवाज दिला की ते आपणाला लगेच ओ अशी हाक निश्चित देऊन, आपल्या प्रत्येक समस्या सोडवणार अशी मी खात्री देतो. म्हणून काटी ग्रामस्थांनी प्रचंड मतानी विजयी करायचेच आहे असा संकल्प केला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जुबेर शेख यांनी केले. सयाजीराव देशमुख, सुजित हंगरकर, श्यामराव आगलावे, तन्वीर काजी, अशोक जाधव, अजयसिंह देशमुख, चंद्रकांत काटे, जुबेर शेख, धैर्यशील गाटे, प्रकाश गाटे, प्रदीप साळुंके, गौरीशंकर कोडगिरे, रवींद्र आंबुरे, विकास आगरकर, भैरवनाथ काळे, अमोल गावडे, कालू कुरेशी, कयूम कुरेशी आदी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top