नळदुर्ग (प्रतिनिधी)- येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अशोक जगदाळे यांनी नळदुर्ग किल्ला गेट येथे जाहीर सभा घेऊन महायुती सरकारवर निशाण साधला. ते म्हणाले कि, पक्ष फोडून राजकारण करता येत नाही. मतदार राजाने मागील लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवून दिली आहे. त्याच पध्दतीने विधानसभेच्या निवडणुकीत ही मतदार राजा भाजपाला त्यांची जागा दाखवून अँड. धिरज पाटील यांना प्रचंड मतानी निवडणूक देणारच असे जाहीर केले. यावेळी माजी नगराध्यक्ष शहाबाज काझी, मुस्ताक कुरेशी, दत्तात्रय दासकर, कमलाकर चव्हाण, ईमाम शेख, शरीफ शेख, खलील सय्यद, संतोश पुदाले, सरदार ठाकुर, हाजीमलंग शेख, शहादाबी सय्यद, बशीर शेख, धनाजी गायकवाड, नाज्योदिन सावकार, संदिप सुरवसे सह नळदुर्ग ग्रामस्थ उपस्थित होते.