तुळजापूर (प्रतिनिधी)- हिंदू समाज एकजुटीसाठी काढण्यात आलेल्या शिवचैतन्य जागरण रथ यात्रेचे आगमन तिर्थक्षेञ तुळजापूर येथे होताच पू. पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांचे सकल हिंदू समाजाच्यावतीने छञपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ महिलांनी त्याचे औक्षण करून स्वागत केले.
नंतर प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांची रथयात्रा मिरवणुकीने मंदिरात दाखल झाली. तिथे आई तुळजाभवानी व आदिमाया आदिशक्ती देवीचे दर्शन घेऊन हिंदू समाजाच्या एकजुटीसाठी संकल्प करून आशीर्वाद घेतले. यावेळी महंत तुकोजीबुवा, महंत सोमवार इच्छागिरी महाराज उपस्थितीत होते. देविदर्शन नंतर मांतगी देविचे दर्शन घेतले. नंतर ही रथयाञा पुजारी मंडळ मंगल कार्यालयात आली. येथे धार्मिक प्रवचन कार्यक्रमात बोलताना पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज प्रवचन संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर महंत मावजिनाथ बाबा, महंत इच्छागिरी महाराज, महंत तुकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा तसेच तालुक्यातील इतर संत, महंत व वारकरी संप्रदाय व सकल हिंदू समाज उपस्थित होता. या कार्यक्रमास तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील व धाराशिव जिल्ह्यातील धर्मप्रेमी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित होते.