तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुरेखा कदम यांना कामधेनू सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कामधेनू सेवा परीवार शाखा भातागळी ता.लोहारा यांच्या वतीने तेर येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुरेखा कदम यांना शैक्षणिक सेवा कार्याबद्दल कामधेनू सेवा पुरस्कार हभप महेश महाराज कानेगावकर, कामधेनू सेवा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉ. लक्ष्मण आसबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.