उमरगा (प्रतिनिधी)-  मुरूम येथील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचा हंगाम 2024-25 चा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा कारखाना कार्यस्थळावर शनिवारी (दि.2) उमरगा जनता बॅकचे चेअरमन शरण बसवराज पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. संपदा शरण पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.

विठ्ठलसाई कारखान्याचे चेअरमन व माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या नियोजनबध्द मार्गदर्शनाखाली कारखाना सुरू असून चालू हंगामासाठी करावयाची संपूर्ण कामे झालेली आहेत. यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रात लागण व खोडवा मिळून 6 हजार हेक्टर ऊसाची नोंद झालेली आहे. या हंगामात कार्यक्षेत्रातील व कारखाना लगतच्या गेटकेन विभागातील ऊसाचे गाळप करून गाळपास आलेल्या ऊसास योग्य भाव देणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बसवराज पाटील यांनी दिली. 

याप्रसंगी काशी, श्रीशैल्यम व उजैन पिठाचे विश्वस्त तथा जिल्हा बँकेचे चेअरमन बापुराव पाटील, कारखान्याचे व्हा. चेअरमन सादीकसाहेब काझी, विठ्ठल पाटील, शरणाप्पा पत्रिके, केशव पवार, माणिक राठोड, विठ्ठलराव बदोले, संगमेश्वर घाळे, दिलीप पाटील, राजीव हेबळे, दत्तू भालेराव, शिवलींग माळी, ॲड. संजय बिराजदार, ॲड. विरसंगप्पा आळंगे, शब्बीर जमादार, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, रशिद शेख, गोंविद पाटील, बुध्दीवंत साखरे, सचिन पाटील, रफिक तांबोळी, प्रल्हाद काळे, अनिल ऊर्फ पप्पु सगर, देवंद्र कंटेकुरे, दत्ता चटगे, योगेश राठोड, भालचंद्र लोंखडे, महेश माशाळकर, संजय बिराजदार, अभिषेक गुज्जर, तसेच कार्यकारी संचालक एम. बी. अथणी व कारखान्यातील सर्व अधिकारी, सभासद, कर्मचारी व कामगार उपस्थित होते.

 
Top