धाराशिव (प्रतिनिधी)- गुटखा व पान मसालाची वाहतूक करणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली असता मुरूम पोलिसांनी कोथळी पुलाजवळ चेक पोस्ट येथे पिक गाडी थांबून त्याची तपासणी केली असता गोवा गुटखा मिळून आला. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी शेलार यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, एक पांढऱ्या रंगाचे पिकअप वाहनामध्ये कोथळी पुलाचे जवळ चेकपोस्ट येथुन अवैध गुटखा वाहतुक करीत आहे. अशी बातमी मिळाल्यावरुन मुरुम पोलीस ठाण्याचे पथकाने सदर ठिकाणी जावून एक पांढऱ्या रंगाचे पिकअप क्र एमएच 23 एयु 5810 थांबवून चेक केले. त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखा मिळून आला. सदर वाहनाचा चालक यास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांने त्याचे नाव- नेहाल माजिद काझी, वय 23 वर्षे, रा. सईज गल्ली धाराशिव, रिजवान शेख रा. खाजा नगर धाराशिव असे सागिंतले. पथकाने सदर पिकअप व त्यातील मिळून आलेला रॉयल 220 टोकॅको 32 गोण्या, बाओबाजी पान मसाला 64 गोण्या, रॉयल 717 तंबाखु, हिरा पानमसाला 10 गोण्या असा एकुण 18 लाख 76 हजार 160 रूपये किंमतीसह पिकअप वाहन क्र. एमएच 23 ए.यु.5810 असा एकुण 26 लाख 76 हजार 160 रूपये किंमतीचा माल जप्त करुन व आरोपी यास ताब्यात घेवून आरोपी यांचे विरुध्द पोलीस ठाणे मुरुम येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहा पोलीस निरीक्षक दहिफळे करत आहे.
सदर कामगिरी ही पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी शेलार, मुरुम पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दहिफळे, पोउपनि गव्हाणे, मुरुम पोलीस ठाण्याचे अंमलदार यांचे पथकाने केली.