परंडा (प्रतिनिधी) -महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीने मिळविलेल्या ऐतिहासिक व दैदिप्यमान विजयाचा भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव व जल्लोष साजरा करुन मिठाई वाटुन भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक, परंडा येथे साजरा केला.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष ॲड. गणेश खरसडे, जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, प्र. का. सदस्य ॲड. जहीर चौधरी, न.प. मा. गटनेते सुबोधसिंह ठाकूर, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सारंग घोगरे, चिटणीस रामकृष्ण घोडके, तालुका सरचिटणीस तानाजी पाटील, धनाजी गायकवाड, तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, ॲड. भालचंद्र औसरे, साहेबराव पाडुळे, किरण देशमुख, मिलिंद शिंदे, धनंजय काळे, मनोहर पवार, गौरव पाटील, सुरज काळे, अमर ठाकूर, आकाश मदने तसेच तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.