धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील चारही विधानसभा निवडणुका अंत्यत चुरशीच्या झाल्या आहेत. परंडा व उमरगा येथे काटे टक्कर पहायला मिळाली आहे. तर तुळजापूरमध्ये भाजपाचे राणाजगजितसिंह पाटील व उस्मानाबाद मधून शिवसेना ठाकरे गटाचे कैलास पाटील व उमरगा येथून शिवसेना ठाकरे गटाचे प्रविण स्वामी विजयी झाल्याचे घोषित केले आहे. तर परंडा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी उशिरापर्यंत संथ गतीने सुरू होती. उमरगा व परंडा येथे शेवटपर्यंत काटे की टक्कर पहायला मिळाली.
उमरगा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे ज्ञानराज चौगुले यांना एकूण 92 हजार 241 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना ठाकरे गटाचे प्रविण स्वामी यांना 96 हजार 206 मते मिळाली. 3 हजार 965 मतांनी स्वामी यांना विजयी घोषित करण्यात आले. उमरगा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी सुरू असताना चौगुले व स्वामी यांच्यात काटे टक्कर पहायला मिळाली. तर उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे कैलास पाटील यांना 1 लाख 27 हजार 928 मते मिळाली. तर शिवसेना शिंदे गटाचे अजित पिंगळे यांना 92 हजार 816 मते मिळाली. 35 हजार 112 मताधिक्याने कैलास पाटील यांनी आपला विजय दुसऱ्यांदा नोंदविला आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे राणाजगजितसिंह पाटील हे दुसऱ्यांद विजयी झाले आहेत. त्यांना 1 लाख 30 हजार 352 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे धिरज पाटील यांना 93 हजार 842 मते मिळाली. पोस्टल मतासह राणाजगजितसिंह पाटील 37 हजार 80 मताधिक्याने विजय मिळविला.
तर परंडा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक काटे की टक्कर प्रमाणे झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे डॉ. तानाजी सावंत काही फेरी पुढे होते. तर काही फेरीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राहुल मोटे पुढे गेले.