उमरगा (प्रतिनिधी)- अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या उमरगा विधानसभा मतदार संघातील चुरशीच्या लढतीत विद्यमान आमदार, महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार ज्ञानराज धोंडीराम चौगुले यांना कमी मताने पराभवाला सामोरे जावे लागले. महाविकास आघाडीतील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमदेवार प्रविण विरभद्रय्या स्वामी यांनी अवघ्या तीन हजार 965 मताधिक्याने विजय मिळवला.  चौगुले यांना टपाली मतासह 92 हजार 241 तर श्री. स्वामी यांना टपाली मतासह 96 हजार 206 मते मिळाली. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राम गायकवाड यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. तर प्रहार जनशक्ती पक्षाचे सातलिंग स्वामी यांना  408 मतावर समाधान मानावे लागले . तर नोटाला 1330 मतदारांनी पसंती दिली .

उमरगा विधानसभा मतदारसंघात 10 उमेदवार निवडून रिंगणात होते. उमरगा  विधानसभा मतदारसंघासाठी एकूण तीन लाख 15 हजार 394 मतदारापैकी एक लाख 94 हजार 896 मतदान झाले होते. शनिवारी सकाळी आठपासून पंचायत समितीच्या सभागृहात एकूण चौदा टेबलवर 23 फेऱ्यातून मतमोजणीला सुरवात झाली. पहिल्या फेरीपासुन अखेरीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (महाविकास आघाडी) उमेदवार प्रविण स्वामी यांनी एक हजार 476 मतांची आघाडी घेतली. स्वामी यांना दुसऱ्या फेरी अखेर दोन हजार 693 मताधिक्य, तिसऱ्या फेरीत आमदार चौगुले यांना 478 मताधिक्य, चौथ्या फेरीत स्वामी यांना एकुण दोन हजार 681 मताधिक्य, पाचव्या फेरीत स्वामी यांना तीन हजार 368 मताधिक्य, सहाव्या फेरीत स्वामी यांना हजार 368 मताधिक्य, सातव्या फेरीत स्वामी यांना हजार 383 मताधिक्य, आठवा फेरीत स्वामी यांना 252 मताधिक्य, नवव्या फेरीत स्वामी यांना 496 मताधिक्य, 10 फेरीत चौगुले यांना 150 मताधिक्य, 11 व्या फेरीत स्वामी यांना 256 मताधिक्य, 12 व्या फेरीत चौगुले यांना 623 मताधिक्य, 13 व्या फेरीत स्वामी यांना 251 मताधिक्य, 14 व्या फेरीत चौगुले यांना 37 मताधिक्य, 15 व्या फेरीत स्वामी यांना एक हजार 81 मताधिक्य मिळाले. 16 व्या फेरीपासुन 21 व्या फेरी पर्यंत आमदार चौगुले दोन हजार 963 मताधिक्य घेतले होते. 22 व्या फेरीत  स्वामी यांना 48 मते अधिक घेतले. तर 23 व्या अंतिम फेरीत आमदार चौगुले यांना 555 मताधिक्य मिळाले. एकुण झालेल्या एक लाख 94 हजार 896 मतदानापैकी ज्ञानराज चौगुले यांना 92 हजार 241 तर प्रविण स्वामी यांना 96 हजार 206 मतदान मिळाल्याने श्री. स्वामी यांनी तीन हजार 965 मताधिक्याने विजय मिळवला.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गणेश पवार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद येरमे, रणजितसिंह कोळेकर यांनी काम पाहिले. उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.


दहा उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे :

प्रविण स्वामी (महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)  96 हजार 206 , आमदार ज्ञानराज चौगुले (महायुती शिवसेना) 92 हजार 241,

 सुनंदा रसाळ (बहुजन समाज पार्टी) एक हजार 176 , राम गायकवाड (वंचित बहुजन आघाडी) चार हजार 87, शिवप्रसाद काजळे (मराठवाडा मुक्ती मोर्चा) 265 , सातलिंग स्वामी (प्रहार जनशक्ती पक्ष) 408, संदीप कटबु (आरपीआय ए) 363,   अजयकुमार देडे (अपक्ष) 539, उमाजी गायकवाड (अपक्ष) 313, श्रीरंग सरवदे (अपक्ष) 845 नकारात्मक मते (नोटा) एक हजार 330. दरम्यान टपाली मतासह एक लाख 98 हजार 54 मतदान झाले आहे.


 
Top