भूम(प्रतिनिधी)- शिवसेना फुटीच्या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख सुनील काटमोरे यांच्या प्रयत्नातून धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये ऊर्जा निर्माण होऊन लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी यश आले आहे.
महाविकास आघाडीचे भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल मोटे यांना ही निवडून आणण्यासाठी गनिमी काव्याने काम केले. परंतु अगदी थोड्या मताने मोटे यांचा पराभव झाला आहे. आत्ता आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जिल्हा संपर्कप्रमुख सुनील काटमोरे यांच्यावर जबाबदारी सोपवली असल्याचे बोलले जात आहे.