तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्रीतुळजाभवानी मंदीर विकास आराखडा अंतर्गत 58 कोटी रुपये विकास कामांना लवकरच प्रारंभ होणार असून, ही विकास कामे दोन टप्प्यात केली जाणार असल्याची माहिती श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली.

यावेळी बोलताना ओम्बासे पुढे म्हणाले कि, श्री तुळजाभवानी मंदीर व परिसरातील कामे दोन टप्यात केली जाणार आहेत. यासाठी 58 कोटी रुपये खर्च  येणार आहे. दोन टप्यातील पहिल्या टप्यातील कामे सहा टप्यात केले जाणार आहेत. यामध्ये असंयुक्तीक बांधकामे काढून टाकणे, यात आरतीसाठी उभारण्यात आलेले शेड जतन व दुरुस्ती, भुयारी मार्ग, यज्ञ मंडप, भवानीशंकर मंदिर जतन दुरुस्ती तसेच नव्याने फरशी बसविणे.

तर दुसरा टप्पा नव्याने केलेले बांधकाम काढणे तसेच निंबाळकर दरवाज्या वरील रोड. जतन व दुरुस्ती गोमुख तीर्थ, दत्त मंदिर, मातंगी  मंदीर व  परिसरातील पायऱ्या राजेशहाजी महाध्दार, श्रीकल्लोळ तिर्थ, सिध्दीविनियक मंदीर, निंबाळकर व्दार, मार्तड रुषी मंदीर, टोळभैरव मंदिर, दीपमाळ, दत्तमंदीर, नियंत्रण कक्ष, शिवाजी महाव्दार व लगतची खोली, खंडोबा मंदिर, लक्ष्मी नरसिंह मंदीर आदी कामांचा समावेश आहे.

भाग क्रमांक 3 मध्ये  अनावश्यक बांधकाम काढणे, पलंग रुम, प्रसाद रुम, गार्ड रुम, होमकुंड, गणेश विहार, जतन व दुरुस्ती करणे. भाग क्रमाक 4 मध्ये अभिषेक हॉल, तुकोजी बुआ मठावरील ओव्हऱ्या, आराध्य खोल्यावरील ओव्हऱ्या काढणे. भाग क्रमांक 5 मध्ये मुख्य प्रवेशव्दार दुरुस्ती, जिजामाता महाव्दार नव्याने बांधणे. तसेच भाग क्रमांक 6 मध्ये  मंदिराला येणा-या वृध्द व अपंग भाविकांसाठी लिफ्ट तसेच रॅम्प करणे आदी कामे केले जाणार आहेत. यावेळी प्रशासकीय व्यवस्थापक तथा तहसिलदार माया माने व धार्मिक व्यवस्थापक तथा लेखापाल सिध्देश्वर इंतुले उपस्थितीत होते.

 
Top