तुळजापूर (प्रतिनिधी)-  मशीनवर मतदान केल्यानंतर आतील चिन्हाची चिठ्ठी मतदारांना देवुन ती  दुसऱ्या बाँक्स मध्ये ऐकञित करुन वोटींग मशीन व चिठ्ठी तील मतदान  वेगवेगळे  मोजुन निकाल देण्याची पध्दत चालु करुन प्रगल्भ लोकशाही अस्तित्वात आणावी. असे प्रतिपादन समाजवादी पार्टी उमेदवार देवानंद रोचकरी यांनी केले.

समाजवादी पार्टी उमेदवार निवडणुक निकाल .वर भाष्य करताना म्हणाले की, मला मतदान कमी पडले म्हणून मतदारांना दोष द्यायचा नाही. यावेळी मशीन घोटाळा झाला असण्याची शक्यता असुन असे असेल तर ही लोकशाहीची  हत्या केल्यासारखे आहे. असे स्पष्ट करून मशीन घोटाळा विरोधात सर्वच पक्षांनी ऐकञित येवुन जनआंदोलन उभारुन लोकशाहीची होणारी हत्या थांबवावी असे यावेळी म्हणाले. मला तुळजापूर, नळदुर्ग शहरात तसेच माझे प्राबल्य असलेल्या गावात दोन अंकी मते मिळाले. नळदुर्गला केंद्रीय मंत्री नितीन  गडकरी व आमच्या खासदार इकरा यांची एकाच वेळी सभा झाली. आमच्या सभेला, रँलीली प्रचंड प्रतिसाद असताना तिथे आम्हाला अकलनीय मत मिळाल्याचे स्पष्ट केले. यावेळी अँड. उदय भोसले उपस्थितीत होते.

 
Top