भूम (प्रतिनिधी)-  जागतिक वारसा सप्ताहानिमित्त भूम तालुक्यातील माणकेश्वर येथील प्राचीन हेमाडपंती श्री क्षेत्र माणकेश्वर महादेव मंदिर येथे पर्यटन स्थळाला भेट व स्वच्छता मोहीम अभियान असे कार्यक्रम राबवण्यात आले. तसेच मंदिरास गावातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी माणकेश्वर येथील ऐतिहासिक वारसा असलेल्या महादेव मंदिराला भेट देवून पाहणी केली.

विद्यार्थ्यांनी मंदिराची स्थापत्य, मूर्तिकलेची माहिती घेतली. यावेळी सहाय्यक संचालक पुरातत्त्व विभाग छत्रपती संभाजी नगर यांनी विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधला. त्यांच्याकडून मंदिराबाबत विद्यार्थ्यांना सखोल माहिती मिळाली. विविध देवदेवतांच्या मुर्ती, मंदिराचा गर्भगृह, सभामंडप, प्रदक्षिणा मार्ग, शिलालेख, नंदीमंडप, देवदेवतांचे वाहन, शस्त्रे याबबत त्यांनी माहिती दिली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपला ऐतिहासिक वारसा आपण जपला पाहिजे असा संदेश त्यांनी दिला. यावेळी माणकेश्वर गावातील ग्रामस्थ, शिवभक्त, शालेय विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक विद्यार्थ्यांसोबत उपस्थित.

 
Top