धाराशिव (प्रतिनिधी)- विधानसभा मतदारसंघ निवडणुकीतील मतदानाचा अधिकार सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह बजावला.
मतदार बंधु भगिनीं यांना आवाहन केले की,मतदान आपला संविधानिक अधिकार असुन लोकशाहीचा महाउत्सव आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणावर साजरा केला पाहिजे. आपले एक मत देशाच्या विकासासाठी आवश्यक असुन मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आपले कर्तव्य पार केले पाहिजे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा मतदार जनजागरण समितीचे गणेश वाघमारे, संजय गजधने, किसन घरबुडवे, विष्णु घरबुडवे, कुसुम वाघमारे, महानंदा गजधने, कल्पना घरबुडवे, पुनम गजधने, साधना वाघमारे, संगिता गजधने, रेश्मा घरबुडवे, विहास घरबुडवे, अमन वाघमारे सह इतर उपस्थित होते.