धाराशिव (प्रतिनिधी)-  विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणूक शांतेतत पार पडावी, अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणेकडून पाच पोलिस उपाधीक्षक, 18 पोलिस निरीक्षक, 104 सहायक निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, 1604 पोलिस शिपाई यांच्यासह 1450 होमगार्ड, 103 एनसीसीचे कॅडेट असा एकूण 3500 पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आहे. 

जिल्ह्यात एकूण 4 विधानसभा मतदारसंघ आहेत. निवडणूक कालावधीत आचारसंहितेचा भंग होवून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, म्हणून पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे केंद्रीय पोलिस पथकातील 4 तुकड्या क्षेत्रात दाखल झाल्या आहेत. यासह राज्य राखीव दलाच्या तुकड्या देखील तैनात केल्या आहेत. पोलिसांकडून गुन्हेगारांवरही करडी नेर ठेवण्यात येत आहे. प्रतिबंधात्मक कारवाई देखील पोलिसांनी सुरू केल्या आहेत. रात्रीच्या वेळेत पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून गस्ती घातली जात आहे. मागील काही दिवसापासून पोलिसांनी बेकायदा शस्त्र जप्त केले आहेत. तसेच संवेदनशील मतदारसंघात पोलिसांचा रूट मार्च काढला आहे. उमरगा विधानसभा मतदारसंघात एक पोलिस उपाधिक्षक, 3 पीआय, 17 एपीआय, 332 पोलिस शिपाई, 305 होमगार्ड, 19 एनसीसी कॅडेट, एक अर्धसैनिक दलाची तुकडी, 5 पोलिस वाहने, 14 अतिरिक्त सुरक्षा रक्षक, तसेच 20 वायरलेसच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच तुळजापूर विधानसभा मतदारसंघात एक पोलिस उपाधिक्षक, 4 पीआय, 23 एपीआय, 373 पोलिस शिपाई, 384 होमगार्ड, 37 एनसीसी कॅडेट, एक अर्धसैनिक दलाची तुकडी, पाच पोलिस वाहने, 20 अतिरिक्त सुरक्षा रक्षक, तसेच 26 वायरलेसच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

परंडा विधानसभा मतदारसंघात 1 पोलिस उपाधिक्षक, 4 पोलिस निरीक्षक, 30 सहाय्यक पोलिस निरीक्षक, 388 पोलिस शिपाई, 367 होमगार्ड, 24 एनसीसी कॅडेट, एक अर्धसैनिक दलाची तुकडी, 6 पोलिस वाहने, 26 अतिरिक्त सुरक्षा रक्षक, तसेच 33 वायरलेसच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तर सीआरओ आणि इतर तुकड्या सुरक्षेमध्ये 2 पीआय, 4 पोलिस उपनिरीक्षक, 110 पोलिस शिपाई, 8 होमगार्ड, 14 वाहने व 2 अतिरिक्त सुरक्षा रक्षक, 16 वायरलेस तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. धाराशिव विधानसभा मतदारसंघात 2 पोलिस उपाधिक्षक, 5 पोलिस निरीक्षक, 30 सहाय्यक पोलिस निरीक्षक, 401 पोलिस शिपाई, 386 होमगार्ड, 23 एनसीसी कॅडेट, एक अर्धसैनिक दलाची तुकडी, 11 पोलिस वाहने, 24 अतिरिक्त सुरक्षा रक्षक, तसेच 33 वायरलेसच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.


 
Top