धाराशिव (प्रतिनिधी)- त्रिलोक्याचे स्वामी भगवान श्री दत्तगुरूंच्या जन्मोत्सवानिमित्त धाराशिव येथे श्री दत्तगुरू जन्मोत्सव गुरूचरित्र पारायण- भजन- कीर्तन श्री दत्तनाम सप्ताह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या सप्ताह सोहळ्यानिमित्त 9 ते 15 डिसेंबर या कालावधीत विविध भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
पिताश्री श्रीमंतराव रणदिवे प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील श्री दत्तगुरू निवास, शांतिनिकेतन कॉलनी, धाराशिव येथे सप्ताह सोहळा घेण्यात येत असून सप्ताह सोहळ्याचे हे 10 वे वर्ष आहे. श्री तुळजाभवानी देविजींचे महंत प.पू. तुकोजी बुवा, हभप आप्पाबाबा महाराज रुईकर, हभप नवनाथ महाराज चिखलीकर यांच्या हस्ते सोमवार दि. 9 डिसेंबर रोजी श्री दत्तगुरूंच्या प्रतिमेचे पूजन करून या सप्ताह सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे. सोमवारी (दि.9) सायंकाळी संगीत विशारद समाधान निचळ, श्रीकांत शिंदे, मंगळवारी (दि.10) भजनसम्राट शिवकुमार मोहेकर तर बुधवारी (दि.11) सायं. 6.30 वा.तानसम्राट अजित कडकडे यांचा भजनसंध्याचा कार्यक्रम होणार आहे. गुरूवारी (दि.13) सायं. 7 वा. गायनाचार्य योगेश इंगळे तर शुक्रवारी ( दि.17) साय. 6.30 वा. गायक दिलीप सावंत यांची सेवा होणार आहे. सप्ताह सोहळ्यात दररोज दुपारी महिला भजनी मंडळाची भजनसेवा होणार आहे. सोमवारी (दि.9) मुक्ताई मंडळ गांधीनगर, मंगळवारी (दि.10) सखी भजनी मंडळ यशवंत नगर, बुधवारी (दि.11) संत जनाबाई मंडळ शांतिनिकेतन कॉलनी, गुरूवारी (दि.12) रुक्मिणी भजनी मंडळ बँक कॉलनी, शुक्रवारी (दि.13) गजानन भजनी मंडळ गणेशनगर तर शहरातील जिजाऊनगर येथील जिजाऊ भजनी मंडळाची भजन सेवा शनिवारी (दि.14) दुपारी होणार आहे. श्री दत्तगुरूंच्या जन्मोत्सवदिनी रविवारी (दि.15) स. 8 वा. पालखी दिंडी सोहळा, स. 10.30 वा. हभप महादेव महाराज चाकरवाडीकर यांचे काल्याचे कीर्तन, दु. 12 वा. श्रींचा जन्मोत्सव सोहळा व दु. 1.30 वा. महाप्रसाद वाटप करून सप्ताह सोहळ्याची सांगता होणार आहे. सप्ताह सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमंतराव रणदिवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी केले आहे.