तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर विधानसभेच्या अंत्यत चुरशीचा झालेल्या निवडणुकीत 36 हजार 510 मताने विद्यमाने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी  दणदणीत  विजय संपादन केला.  तर काँग्रेस उमेदवार अँड. धिरज कदम पाटील हे व्दितीय स्थानावर राहिले. तृतीय स्थानी समाजवादी पार्टीचे देवानंद रोचकरी राहिले.

एकुण 3 लाख 83 हजार 77 मतदार असुन यापैकी 2 लाख 56 हजार 571  म्हणजे (66.98)टक्के झाले होते. शनिवार दि. 23 नोव्हेंबर रोजी श्रीतुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय  स्पोर्ट हाँल येथे सकाळी 8 वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. प्रथम टपाली  मोजणी करण्यात आली. यात  आमदार राणाजगजितसिंह पाटील आघाडी घेतली. नंतर ईव्हीएम मशीन मोजणीतील मतदान मोजणीस प्रारंभ झाला. प्रथम फेरी पासुन आमदार राणाजगजितसिंह पाटील आघाडी घेवुन त्यांनी शेवट फेरीपर्यत ही आघाडी कायम ठेवून विजय संपादन करुन तुळजापूर विधानसभा मतदार संघाची भाजप जागा कायम ठेवली.

मतमोजणी संपताच निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार डव्हळे  यांनी विजयी उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना  विजयाचे प्रमाणपञ दिले. यावेळी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार अरविंद बोळंगे उपस्थितीत होते.


 
Top